Type to search

क्रीडा

चेन्नईचा अंतिम सामन्यात प्रवेश

Share

विशाखापट्टणम । दिल्लीने ठेवलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. फाफ ड्यु प्लिसिसने आक्रमक फलंदाजी करत सुरुवातीपासूनच दिल्लीच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये केलेल्या 42 धावांमध्ये ड्यु प्लिसिसचे 37 धावांचे योगदान होते. त्यानंतर सुरुवात अडखळत करणार्‍या शेन वॉट्सनने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. दोघांनी 10 षटकात 81 धावांची सलामी दिली. ड्यु प्लिसिस आणि वॉट्सन दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली.

पण, दोघेही अर्धशतक करुन दोघेही बाद झाले. त्यानंतर रैनाही फारसे काही करु शकला नाही तो 13 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला. दिल्लीने चेन्नईच्या पाठोपाठ विके घेतल्या खर्‍या पण, तोपर्यंत चेन्नई विजयाच्या जवळ पोहचला होता. रायडूने 20 धावा केल्या तर धोनीने 9 धावा केल्या. पण, धोनीला विजयी षटकार मारत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. इशांत शर्माने त्याला झेलबद केले. पण, ही कमी 18 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत ब्राव्होने पूर्ण केली. त्यामुळे दिल्लीचे पहिल्यांदाच फायनल गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीला पॉवर प्लेमध्ये मोठे धक्के दिले. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकणार्‍या पृथ्वी शॉला दिपक चहरने 5 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये भलत्याच फॉर्ममध्ये आलेल्या हरभजन सिंगने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये चेन्नईला पुन्हा यश मिळवून दिले. त्याने शिखर धवनला 18 धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा मोठा धक्का दिला. या दोन धक्यामुळे दिल्लीला पॉवर प्लेमध्ये फक्त 41 धावा करता आल्या.

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीला पॉवर प्लेमध्ये मोठे धक्के दिले. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकणार्‍या पृथ्वी शॉला दिपक चहरने 5 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये भलत्याच फॉर्ममध्ये आलेल्या हरभजन सिंगने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये चेन्नईला पुन्हा यश मिळवून दिले. त्याने शिखर धवनला 18 धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा मोठा धक्का दिला. या दोन धक्यामुळे दिल्लीला पॉवर प्लेमध्ये फक्त 41 धावा करता आल्या.

शॉ आणि धवन बाद झाल्यानंतर कॉलिन मुनरो आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुनरोने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावगती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण, जडेजाने फटकेबाजी करणार्‍या कॉलिन मुनरोला 27 धावंवर बद करत ही जोडी फोडली.

हरभजन आणि जडेजा या फिरकीपटूनी दिल्लीला आपल्या फिरकीत फसवल्यानंतर ताहीर तरी कसा मागे राहील त्याने कर्णधार श्रेयस अय्यरची शिकार केली. पाठोपाठ ब्राव्होने अक्षर पटेलला बाद केल्याने दिल्लीचा निम्मा संघ 13 षटकात 85 धावांवर माघारी परतला.

दिल्लीची ही पडझड अखेरपर्यंत काही थांबली नाही. हरभजने रुदरफोर्डला बाद करत आयपीएलमधील आपला 150 वा बळी टिपला. दिल्लीचा डॅशिंग पंतने गेल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात झुंझार खेळी केली. त्याच्या 38 धावांच्या खेळीमुळे दिल्लीला चेन्नईसमोर 148 धांवांचे आव्हान ठेवता आले.

अखेरच्या षटकात इशांत शर्माने षटकार आणि चौकार मारत दिल्लीला 147 चे फायटिंग टार्गेट देण्यात हातभार लावला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!