चॅम्पियन्स लीग फूटबॉल : रोनाल्डोच्या युव्हेंटसला पराभवाचा धक्का!

0
तुरीन। तब्बल 11 कोटी, 20 लाख युरो किमतीत संघात सहभागी झालेल्या नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बुधवारी युव्हेंटसचा पराभव टाळता आला नाही. तुलनेने कमकुवत मानल्या जाणार्‍या आयएक्सने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या सामन्यात युव्हेंटसवर 2-1 अशी मात करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

10 एप्रिल रोजी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात आयएक्सने युव्हेंटसला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. परंतु मंगळवारी रात्री झालेल्या लढतीतील विजयामुळे आयएक्सने 3-2 अशा एकंदर गोलसंख्येच्या बळावर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी कमालीची चुरस पाहायला मिळाली. रोनाल्डोने 28व्या मिनिटाला हेडरद्वारे अफलातून गोल करत युव्हेंटसला आघाडी मिळवून दिली. चॅम्पियन्स लीगमधील आतापर्यंतच्या कारकीर्दीतील त्याचा हा 126वा गोल ठरला. मात्र 34व्या मिनिटाला 21 वर्षीय डॉनी व्हॅन डे बीकने गोल करत आयएक्सला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मध्यांतरापर्यंत सामना 1-1 अशा बरोबरीत राहिल्यानंतर युव्हेंटसने अधिक आक्रमक खेळावर भर दिला. मात्र मॅथिग्स डी’लेट या किशोरवयीन खेळाडूने 64व्या मिनिटाला हेदरद्वारे संघासाठी दुसरा व निर्णायक गोल नोंदवून आयएक्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता उपांत्य फेरीत आयएक्सची गाठ मँचेस्टर सिटी आणि टॉटेनहॅम यांच्यातील विजेत्याशी पडणार आहे. आयएक्सने यंदा रेयाल माद्रिदसारख्या बलाढय संघालादेखील पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे त्यांच्यापासून सर्वच संघ धसका घेत आहेत.

19971997 नंतर प्रथमच आयएक्सने चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली आहे.

9रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये आयएक्सविरुद्ध नऊ गोल नोंदवले आहेत. सध्या तो ज्या संघाचे प्रतिनिधित्व करतो, त्या युव्हेंटसविरुद्धच त्याने यापूर्वी सर्वाधिक 10 गोल केले होते.9नऊ वर्षांनंतर (2010नंतर) प्रथमच रोनाल्डोला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत खेळता येणार नाही.

LEAVE A REPLY

*