‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

0

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकरला लोकप्रिय केले.

याच मालिकेमुळे मालवणी भाषा आणि कोकणचे गाव या गोष्टींना टीव्हीच्या विश्वात पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले.

आता पुन्हा एकदा तीच कोकणी माणसे आणि त्यांच्या गजाली घेऊन लेखक प्रल्हाद कुडतरकरची नवीन मालिका ‘झी मराठी’वर लवकरच दाखल होते आहे.

सध्या सुरू असलेली ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी ‘गाव गाता गजाली’ ही नवीन मालिका दाखल होते आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘हंड्रेज डेज’ या मालिकेचे निर्माता संतोष कणेकर यांनीच ‘गाव गाता गजाली’ची निर्मिती केली आहे. तर या गजाली लिहिण्याची आणि अभिनयातून पोहोचवण्याची दुहेरी जबाबदारी या मालिकेतही प्रल्हाद कुडतरकर पेलताना दिसणार आहे, तर दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे.

कोकणी माणसांचा स्वभाव मुळातच गप्पिष्ट. चार मंडळी जमवून गप्पा छाटत बसणे हा कोकणी माणसांचा आवडता उद्योग. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलल्या जाणाऱ्या मालवणी भाषेत या गप्पांनाच ‘गजाली’ असे म्हटले जाते.

LEAVE A REPLY

*