चीन-पाकिस्तानसह लढण्यास भारत तयार : लष्करप्रमुख रावत

0
चीन-पाकिस्तानसह देशातंर्गत शत्रुंसह लढण्यास भारतीय लष्कर तयार असल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रावत म्हणाले, आम्ही अतिशय वेगवान पध्दतीने लष्कराचे अत्याधुनिकरण करत आहोत.
आपल्याकडे असणारी 30 टक्के हत्यारे ही जुनी आहेत. कमी वापर होणारी हत्यारे 40 टक्के आहेत. अत्याधुनिक उपकरणे ही 30 टक्के आहेत.
काश्मीरमधील स्थितीवर रावत म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती लवकरच सुधारेल.
पाकिस्तानमधील सोशल मीडियाच काश्मीरातील युवकांना भडकवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*