चीनमध्ये मॅक्सियन काऊंटी येथे भूस्खलन, ४० घरे उद्धवस्त झाल्याची भिती

0

चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मॅक्सियन काऊंटी गावात भूस्खलन झाले असून यात  सुमारे १०० हून अधिक लोक गाडले गेल्याची शक्यता आहे.

सिच्युआन प्रांताताील मॅक्सियन काऊंटी येथे झालेल्या या नैसर्गिक दुर्घटनेत किमान ४० घरे उद्धवस्त झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेनंतर बचावदलांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

*