चीनमध्ये नकली नोकिया ३३१० लॉन्च

0
भारतात नोकिया फोन ३३१० लॉन्च होण्यासाठी अजून काही अवधी बाकी असला तरी मात्र चीनमध्ये नोकिया ३३१० ह्या मोबाईलचे नकली वर्जन समोर आले आहे.

ऑनलाइन टेक्‍नोलॉजी मैगजीन द मोबाइल इंडियनवर छापलेल्या वृत्तानुसार अधिकृत लॉन्‍चच्या आधी नोकिया ३३१० चे नकली चायनीज वर्जन वेबसाईटवर पाहण्यात आले आहे.

नकली नोकिया ३३१० मोबाइल हुबेहूब एचएमडी ग्‍लोबल द्वारा लॉन्‍च केल्या गेल्या नोकिया ३३१० सारखा दिसतोय.
बाजारात नोकिया ३३१० मोबाईल उपलब्ध नसल्याने खरा आणि नकली खरेदी करताना फसवणूक होऊ शकते.

कसा ओळखाल खरा नोकिया ३३१० :
– बारीकरीत्या निरीक्षण केले तर खऱ्या आणि नकली फोन मध्ये अंतर आहे.
– खऱ्या फोनचा डिस्प्ले स्पष्ट दिसते मात्र नकली फोनचा डिस्प्ले पुसट दिसतो.
– दोघांच्या फॉण्ट मध्ये फरक दिसतो.
– खऱ्या नोकिया ३३१० चे होम स्क्रीन बटन मधोमध दिले गेले आहे मात्र नकली मोबाईल मध्ये उजवीकडे दिले गेले आहे.
-तसेच ‘गो टू’ बटन नकली नोकिया ३३१० मध्ये नाही.

LEAVE A REPLY

*