Type to search

नंदुरबार

चिनोदे येथे कानुमातेचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

Share

चिनोदा ता. तळोदा । तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे दि.12 ऑगस्ट रोजी सोमवारी कानुमातेचे विधीवत व भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

उत्सवाचा आनंद, रोट तयार करण्याची लगबग, घरोघरी वाजणारी कानुमातेची गीते आणि मातेचा जयघोष करीत एका दिवसाच्या मुक्कासाठी आलेल्या खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेची दि.11 ऑगस्ट रोजी रविवारी विधीवत स्थापना करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेनंतर दर्शनासह रोट पूजनासाठी भाविकांची एकच गर्दी झालेली दिसून येत होती. तसेच रात्री कानुमातेच्या गाण्यांवर ठेका धरत भाविकांनी नृत्य केले. तसेच दि. 12 ऑगस्ट रोजी सोमवारी कानुमातेला मनोभावे निरोप देण्यासाठी सकाळी विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. कानुमातेचा उत्सव म्हटला म्हणजे कुटूंबातील गोतावळा एकत्र येत असतो. यानिमित्त नोकरी, व्यवसाय व विविध कारणांमुळे दुरावलेले भाऊबंदकीची मने पुन्हा जुळून येतात.

खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेच्या उत्सवाला पारंपारिक व धार्मिक महत्त्व आहे. चिनोदा येथे नागपंचमी नंतरच्या रविवारी व सोमवारी कानुमातेचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही कानुमातेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. दि.11 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळपासून कानुमातेच्या स्थापनेसाठी मंडपाची सजावट करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील महिलांनी रोट तयार केले. सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान कानुमातेची विधीवत स्थापना करण्यात आली होती. पाच वाजेनंतर रोट पुजल्यानंतर परिसरातील भाविकांनी तयार केलेले रोटांचे कानुमातेला नैवेद्य दाखवून पुजन करण्यात आले. तसेच कानुमातेच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यत कानुमातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरू होता.

एका दिवसाच्या मुक्कामाला येणार्‍या मातेच्या उत्सवासाठी रात्रभर जागरण करावे लागते. म्हणून अनेक ठिकाणी कानुमातेसमोर फुगड्या घालण्यात आल्या, व विविध गाण्यांवर ठेका धरत भाविकांनी नृत्य केले. या उत्सवामुळे गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. दि.12 आगस्ट रोजी सोमवारी कानुमातेला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. यासाठी सकाळी आठ वाजेपासून कानुमातेच्या विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सर्वच कानुमाता गावातील मुख्य चौकात एकत्र येऊन कानुमातेची वाजत – गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. व गावाबाहेरील विहिरीवर कानुमातेचे विधीवत विसर्जन करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!