चित्रपटगृहात राष्ट्रगीतावेळी ‘या’ व्यक्तींना उभे राहणे सक्तीचे नाही

0

चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहण्याची सक्ती केल्याने मारहाणीचे प्रकार घडत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. १० प्रकारच्या व्यंगत्वांची यादी सर्वोच्च न्यायालयाकडून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे व्यंगत्व आणि अपंगत्वाचा सामना करणाऱ्यांना चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे सक्तीचे नसेल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे व्यंगत्व असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सेरेब्रल पाल्सी, पार्किन्सन्स रोग, मस्क्युलर डायस्ट्रोपी, अंधत्व, कर्णबधीर, अपंगत्व, मल्टीपल स्केलेरोसिस यांच्यासह बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना राष्ट्रगीताच्यावेळी आसनावर बसता येईल.

यावर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने अंतिम अहवाल तयार करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

३० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक चित्रपटाआधी राष्ट्रगीत लावण्याचे आदेश दिले होते.

 

LEAVE A REPLY

*