चिडलेल्या शेतकर्‍यांचा संप चालूच ठेवण्याचा निर्धार श्रीरामपूर येथील बैठकीत निर्णय

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शेतकरी संपातील मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे बोलविलेल्या बैठकीत अचानक संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने शेतकर्‍यांना धक्का बसला. चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी बनावट आश्‍वासन देऊन फसविले व शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला असल्याची भावना तयार होऊन चिडलेल्या शेतकर्‍यांनी नियोजित संप पुढे चालूच ठेवण्याचा निर्धार श्रीरामपूर येथील बैठकीत केला. बैठकीस शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, छावा युवक संघटना, महाराष्ट्र कृषक समाज संघटना व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची दिशाभूल चालविली असून जयाजी सुर्यवंशी सारखे सुर्याजी पिसाळ हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा उत्स्फुर्त ऐतिहासिक संप मोडून काढण्याचा रचलेला डाव उधळून लावण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, खा. राजू शेट्टी व आमदार बच्चू कडू यांनी पुढील आंदोलनाचे नेतृत्व करावे असा ठराव करण्यात आला. सरकारच्या शेतकरी द्रोही कुटील नितीचा अनेक वक्त्यांनी समाचार घेतला.

 

 
बैठकीस शेतकरी संघटनेचे प. महा. विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके, शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अहमदभाई जहागिरदार, प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई, कृषीभुषण माऊली पवार, छावा युवा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष जंगले, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, अ‍ॅड. सर्जेराव कापसे, डॉ. बापूसाहेब आदिक, श्रीरामपूर कार्याध्यक्ष विलास कदम, राहुरी ता. अध्यक्ष प्रशांत कराळे, स्वाभिमानीचे राहुरी ता. अध्यक्ष रवि मोरे, श्रीरामपूर ता. अध्यक्ष चंद्रकांत ुंडे, सुभाष आदिक, अशोक टेकाळे, अविनाश जगताप, स्वाभिमानीचे जितेंद्र भोसले, भरत आसने, शरद आसने, अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. दिलीपराव मुठे, शंतनू फोफसे, कैलास बोर्डे, दत्तात्रय लिप्टे, गोविंद वाबळे, अनिल औताडे, बाळासाहेब कदम, बब्लू पठाण, तुकाराम मुठे, राजेंद्र टेकाळे, छावाचे नितीन पटारे, अरुण कवडे, संदीप आदिक, संदीप उघडे, शरद आदिक, अजिंक्य गलांडे, नंदू खंडागळे, वाल्मिक गवारे, संदीप गवारे, संदीप दांगट, किशोर झिंजाड, सुरेश पटारे, मयूर पटारे, उमेश राऊत, दादासाहेब टेकाळे, प्रकाश दोंड, धनंजय खंडागळे, प्रशांत आदिक, श्रीकांत भोसले, प्रविण बनकर, हर्षल बंगाळ आदी श्रीरामपूर, राहुरी नेवासा, राहाता, येथील शेतकरी उपस्थित होते.

 

 
संपकाळात खोकरचे सरपंच राम पटारे व शेतकरी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन खर्‍या गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. बैठकीनंतर सुमारे 300 ते 400 शेतकर्‍यांनी श्रीरामपूर शहरातून रॅली काढून शेतकरी संप चालू राहणार असल्याचे आवाहन केले. श्रीरामपूर बाजार समितीत रॅलीने येऊन व्यापारी व पदाधिकार्‍यांना संप काळात खरेदीविकी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सभागृहात शहर पो. नि. प्रविण लोखंडे यांनी आंदोलन विधायक मार्गाने करण्याचे आवाहन केले.

 

 
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम असून, शहरांकडे होणारा दूध, भाजीपाला, फळे इ. शेतीमाल पुरवठा बंद करण्यात येईल. दि. 5 जून रोजी राज्यव्यापी बंद पुकारला असून श्रीरामपूर शहर व गावे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. 6 जून रोजी तहसील कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन दि. 7 जून रोजी आपापल्या मतदारसंघातील शेतकरी आमदार व खासदारांचे कार्यालय कुलूप ठोकण्यात येईल. दि. 8 जून रोजी नाशिक येथे रघुनाथ दादा पाटील, आ. बच्चू कडू व खा. राजू शेट्टी संयुक्त बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.

LEAVE A REPLY

*