चिचोंडी पाटील येथे सराफी दुकानात चोरी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे सराफी दुकानातून 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब बाबासाहेब कर्डिले या सराफ व्यावसायिकाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. कर्डिले यांचे चिचोंडी पाटील येथे सराफी दुकान आहे. दुकानाचे मागेच त्यांचे निवासस्थान आहे. बाहेरगावी गेल्याने घर व दुकान बंद होते. बंद दुकानाचे सेंटर लॉक तोडून चोरट्यांनी हातसफाई केली. बाहेरगावाहून आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे कर्डिले यांच्या निदर्शनास आले. 30 हजार रुपये किंमतीची चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे कर्डिले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 22 जुलै रोजी मध्यरात्रीला चोरीची ही घटना घडली. बुधवारी (दि.2 ऑगस्ट) त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

*