चाळीसगाव येथे मध्यरात्री दरोडा : मारहाणीत पत्नीचा मृत्यू ,पती गंभीर

0

३५ हजारंाचे सोन्यांचे दागीन घेऊन पोबारा

मनोहर कांडेकर | चाळीसगाव :  शहरातील हिरापूर रोडस्थित आदर्शनगर भागातील भरवस्तीत असलेल्या घरांवर गुरुवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पती-पत्नीने दारोखोरांना प्रतिकार केला असता, त्यांनी केलेल्या जबर मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याना धुळे येथे उपचार नेण्यात आले आहे.

घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले असून त्याने हिरापूर रोडवरील नविन नाक्या पुढे स्वामी समर्थ आर्पामेंट जवळील हनुमान मंदिरापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला आहे.

दगडू दौलत देवरे (६०) व जिजाबाई दगडू देवरे (५५) रा. हिरापूर रोड आदर्श  नगर हे घरात झोपलेले असताना दि.३ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात दारोडेखोर्‍यंानी टॉमीच्या साह्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी तरी घुसल्याचे समजताच पती-पत्नीला जाग आली. त्यांनी लगेच दरोडेखोरांना हटकण्यांचा प्रयत्न केला.

पत्नी-पत्नी दोघांनाही दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. जवळच असलेले लाकडाचा दांडा जिजाबाई यांच्या डोक्यात टाकला असता, त्यांना जबर दुखापत होत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दगडू दौलत हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोघे पती-पत्नी ठार झाल्याचे समजून दरोडेखोरांनी संपूर्ण घरांची झडती घेत कपाटातील सामानाची फेका-फेक केली.

कपाटातील ३५ हजार रुपय किमतीचे सोन्याचे दागीने घेऊन पसार होण्यांच्या तयारीत असतानाच, समानाच्या फेका-फाकीचा आवाज ऐकूण बाजूच्या घरात झोपलेला दगडू देवरे यांचा मुलगा नितीन दगडू देवरे यांना जागा आली. त्याने लगेच पुढे येऊन पाहिले असता, दरोडेखोर मुद्देमाल घेऊन पळण्यांच्या तयारीत होते.

नितीन यांने एका दरोडेखोरांचा पाठलाग करत, एकाच्या अंगावर सायकल मारून फेकली. परंतू अंधाराचा फायदा घेत व घरांच्या बाजूला असलेल्या नाल्याकडून दोघा दरोडेखोरांनी पोबारा केला. वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकूण नितीन याने दरोडेखोरांचा पाठलाग सोडून वडिलांच्या दिशेने धाव घेतली.

आईचा मृतदेह पाहुण त्याने एकच हबंरडा फोडला. त्याचा आवाज ऐकूण लगेच पुढच्या रुममध्ये झोपलेला दुसरा भाऊ जागे झालेत.त्यांनी पोलीस स्टेशनला कळविले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. दरोड्यांची बातमी ऐकताच घटनास्थळी आमदार उन्मेश पाटील यांनी भेट देऊन परिवारांचे सांत्वन केले. दरोड्याच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ असून बघ्यांची गर्दी जमली होती.

घटनास्थळी जळगांव येथील श्‍वान पथक तसेच फिंगर प्रिंट टिमने तपासणी केली आहे. हॅप्पी नावाच्या श्‍वानाने हिरापूर रोडवरील नविन नाक्या पुढे स्वामी समर्थ आर्पामेंट जवळील हनुमान मंदिरापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला आहे. पोलिस आधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, उपविभागीय पोलीस आधिकारी अरविंद देवरे, पो.नि.सुनिल गायकवाड यानी घटनास्थळी भेट देत पुढील तपासाबाबत आधिकार्‍यांनी सूचना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*