चाळीसगाव पोलिसांचे निर्भया पथक गेले कुठे?

0

चाळीसगाव | प्रतिनिधी :  महिला व मुलींच्या सुरेक्षतेसाठी चाळीसगाव पोलीसांकडून मागील वर्षी दि.२८ जुर्ले २०१६ रोजी मोठा गाजा-वाजा करुन, निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. दोन महिला कर्मचारी असलेल्या हे पथक फक्त दोन महिने चालविण्यात आले होते. त्यानंतर ते बंद करण्यात आले असून आता पोलीसांकडून महिलांची सुरक्षा वार्‍यावर सोडविण्यात आली आहे. आम जनतेकडून निर्भया पथक गेले कुठे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शाळा, महाविद्यालय व शिक्षणासाठी एस.टी.च्या माध्यमातून प्रवास करणार्‍या विद्यार्थीनीची बस स्टॅण्ड परिसरात गर्दी असते अशा ठिकाणी महिलांच्या मदतीसाठी चाळीसगाव पोलीसांकडून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकात दोन दुचाकीस्वार महिला पोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाला गुरुवारी अप्पर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यानी हिरवा झेडा दाखऊन सुुरुवात केली होती.

nirbhya-logo

या पथकात दोन महिला कर्मचारी दुचाकीवर गस्त घालत होत्या. दोन महिन्यात या पथकातील महिला पोलीस कर्मचार्‍यांनी ११ रोड रोमियो आणि महिलांची छेड काढणार्‍यांवर कारवाई केली होती. दोन महिने सुरळीत चालणारे हे पथक अचानक चाळीसगांव पोलीसांकडून अचानक बंद करण्यात आले. ह्या पथकामुळे शहरात रोडरोमियो तसेच महिलांची छेड काढणार्‍यांवर वचक बसलो होतो.

तसेच समाजात निर्भया पथकामुळे चांगल संदेश देखील जात होता. आता गेल्या सहा महिन्यांपासून हे पथक दिसेनासे झाले आहे. रोडरोमियोंची व महिलांची छेड काढणार्‍यांची हिम्मत वाढलेली आहे.

भितीपोटी बर्‍याच कॉलेजच्या तरुणी पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार करण्यासाठी येत नाही. निर्भाया पथकाकडे बर्‍याच तरुणीनी स्वता;हुन तक्रार केल्यामुळे तरुणांच्या विरोधात कारवाई करणेे शक्य झाले होते.

कॉम्प्लेक्समध्ये प्रेमी युगलाच सुळसुळाट

शहरातील गायत्री कॉम्प्लेक्स व इतर ठिकाणी सकाळी व रात्री प्रेमी युगालाच नेहमीच सुळसुळाट असतो. काही प्रेमी युगल तर दिवसाढवळ्या आश्‍लील जाळे करीत असतात. गाळे धारकांनी त्याना हाटकले की, उलट गाळेधारकानाच धमकी दिली जाते.

त्यामुळे आशा प्रेमी युगलाचाही पोलीसांनी बंदोबस्त करण्यांची मागणी गाळेधारकांडून केली जात आहे. निर्भाया पथकामुळे अशा प्रेमीयुगावर धाक बसला होता. त्यामुळे हे निर्भाया पथक पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

*