चाळीसगाव न.पा.च्या सत्ताधारी व विरोधकांच्या खंडाजगीत १३० कोटीचा अर्थसंकल्प सादर

0

चाळीसगाव, |  प्रतिनिधी :   नगर परिषदेच्या इतिहासात भाजपांची सत्ता स्थापन झाल्यानतंर पहिल्यादाच सत्ताधारी भाजपाच्यावतीने मंगळावारी न.पा.चा सन २०१७-२०१८ चा एकुण१३० कोटी १५ लाख ७० हजार ३८६ रुपयांचे अंदाजपत्रक असलेला, आणि ९० लाख ४० हजार ६ रुपय शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला.

यावेळी विरोध्दी शविआच्या सदस्यांकडून बर्‍याच मुद्दांवर आक्षेप घेत अर्थसंकल्पलातील खर्चाच्या आकडेेवारीत झालेल्या घोळाला विरोध दर्शवत अर्थसंकल्पात दुरुस्तीच्या सुचना केल्यात.

यामुळे प्रथमच दिवसभर चालेलेल्या अर्थसंकल्पात सत्ताधारी व विरोध्दकांमध्ये अनेक मुद्दांवर खंडाजगी झाली. आता आक्षेप घेतलेल्या मुद्दांमध्ये दुरुस्त्याकरुन तसेच आकडेवारीत असलेल्या चुका दुरुस्त करुन, अंतिम अथर्र्संकल्प येत्या दोन ते तीन दिवसात मजुंर केला जाणार आहे. त्याला २८ तारेखेचीच मजुंरी दाखविण्यात येणार असल्याचे यावेळी बोलले जात होते.

न.पा.च्या सभागृहात मंगळवार दि.२८ रोजी नगराध्यक्ष आशालता विश्‍वास चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाताई रमेश चव्हाण व मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यंाच्या अध्यक्षेतेखाली भाजपाच्या सत्ताधार्‍यांकडून प्रथम न.पा.चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

१३० कोटी १५ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा एकूण वर्षीक अंदाजपत्रक असलेल्या व ९० लाख ४० हजार ६ रुपय शिल्लक असलेला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विरोध्दकांनी जवळपास सर्वच भांडवली खार्चाच्या तरदुतीनां जोरदार विरोध केला. प्रथमच संकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या अर्थसंकल्पाच्या चर्चेत सत्ताधारी व मुख्याधिकार्‍यांना उत्तरे देणे मुश्किल झाले होते.

अनेक भांडवल खार्चाच्या तरतुदीमध्ये सुचवलेल्या नविन तरदुती शिवाय बजेट मजुंर होणार नाही. दुरुस्तीचा अहवाल संभागृहापुढे ठेवल्या शिवाय बजेेट मजुंर होणार नाही, असा आक्रमण पवित्र शहविआचे गटनेते राजीव देशमुख यांच्यासह सर्व विरोधी नगरसेवकांनी घेतल्यामुळे, सत्ताधार्‍यांनी त्यांच्या शहारांच्या विकासाबाबत असलेल्या दुरुस्त्या स्विकारल्या असून, आता दुरुस्ती केलेला अंतिम अर्थसंकल्प येत्या दोन ते तीन दिवसात मजुंर केला जाणार आहे.

तसेच सादर केलेल्या अर्थसंकल्पातील बर्‍याच आकडेवारीमध्ये चुका असल्यामुळे आकडेवारीत दुरुस्ती करुन अर्थसंकल्प सादर केल्यांचे सत्ताधार्‍यांचे म्हणने आहे.

दादांनी अण्णांना स्टेज वरुन उतरविले!-

न.पा.च्या सभागृहात सकाळी ११ वा.अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात झाली. यावेळी भाजपाचे गटनेते राजेद्र(अण्णा) चौधरी हे सरळ मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांच्या बाजूच्या खुर्चीवर स्टेजवर जाऊन बसले. ही बाबा शहविआचे गटनेते राजीव(दादा) देशमुख व इतर नगरसेवकांच्या लक्षात येताच, अर्थसंकल्पीय चर्चा सुरु होण्या आगोदरच राजेंद्र(अण्णा) यांना खाली बसवा असा पवित्रा घेत, गटनेता स्टेजवर बसत नसल्याचे नियमात बसत नाही, त्याना स्टेजवर बसण्याचा आधिकार नाही, म्हणून जोरदार विरोध केला.

त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण होऊन सत्ताधारी व विरोध्दाकांमध्ये चांगलीच तु तु-मै मैं झाली. नतंर राजीव देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर राजेंद्र(आणा) चौधरी यांना स्टेज वरुन खाली उतरुण नगरसेवकांच्या रांगेत बसावे लागले. यामुळे दादांनी अण्णांना स्टेज वरुन उतरविल्यांची चर्चा रंगली होती.

विरोध्दाकांची अक्रमक भूमीका

सन २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पात शहरविकासांचे  एकूण २६ मुद्दावर निधीची तरदूत असलेला १३० कोटी १५ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा एकूण वर्षीक अंदाजपत्रक व ९० लाख ४० हजार ६ रुपयांचा  शिल्लकी अर्थसंकल्पातील सत्ताधारी भाजपाकडून मंगळवारी सादर  करण्यात आला. दिवसभर चालेल्या अर्थसंकल्पीय चर्चेत वैशिष्टपूर्ण निधी, स्वच्छ भारत अतर्ंगत शौचालय बांधकाम, रेल्वे भुयारीमार्ग, सल्लागार फी यांच्यासह जवळपास सर्वच मुद्दयांवर विरोधी गटनेते राजीव देशमुख यांच्यासह त्यंाच्या सहकार्यांनी जोरदार विरोध दर्शविला.

गटनेते राजीव देशमुख यंानी १४ व्या वित्त आयोगाकडून सन २०१५-०१६ चा आलेला निधी पडून आहे, तो आगोदर खर्च करा, अशा सुचना केल्या तसेच अनेक कामांच्या वर्क ऑर्डर असतानाही कामे होत नाही. तसेच सुरु असलेली कामे देखील बंद पाडण्यात आली आहेत असे मुद्दे उपस्थितीत केले. यावर उत्तर देताना सत्ताधारी भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांनी आचार संहिता तसेच राजकारणामुळे कामे थांबल्याचे स्पष्टीकरण दिले.

राजकारण हा शंब्द वापरताच विरोध्दाकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि राजेंद्र चौधरी यांना घेरले, यामुळेे सभागृहात काही काळ वातावरण तग झाले होते. दिवभर झालेल्या अर्थसंकल्पयी चर्चेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धल्यामुळे बर्‍याच मुद्दांवर सभागृहात तु तु-मैं मैं होऊन वातावरण अशांत झाले होते.

चर्चत सहभाग

सत्ताधारी पक्षाकडून गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक नितिन पाटील, संजय रतनसिंग पाटील, नगरसेविका सायली रोशन जाधव, तर विरोधी पक्षाकडून गटनेते राजीव देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, सुरेश स्वार, अन्ना कोळी, सुर्यकांत ठाकुर, नगरसेविका सविता सत्यवान राजपूत, संगीत गवळी आदिनी अर्थसंकल्पीय चर्चेत सहभाग घेतला.

यात पहिल्यादाच निवडणुन आलेले नगरसेवक सुर्यकांत ठाकुर यांनी विमा योजनेच्या मुद्यावर तर सायंली जाधव यांनी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधीचे मुद्दे उपस्थित करुन, सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.

सर्व घटकाना न्याय

आम्ही ९० लाखांच्या शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला असून शहरातील सर्व घटकाना न्याय देण्यांचा  प्रयत्न केला आहे. विकासाच्या दृष्टीकोनातून विरोधकांडून आलेल्या सुचना मान्यकरुन तशी तरदुत अर्थसंकल्पात केली जाणार असून आकडेवारीत झालेल्या चदुरुस्त करुन अर्थसंकल्प सादर केल आहे.

नगराध्यक्षा आशालता विश्‍वास चव्हाण

LEAVE A REPLY

*