चाळीसगावात पावणेतीन कोटींच्या विकासकामांचे भुमिपूजन

0

चाळीसगाव, |  प्रतिनिधी :  चाळीसगाव नगरपरिषदेमार्फत शहर विकास यात्रेत चाळीसगाव शहरातील विविध प्रभागांमधील २ कोटी ८५ लक्ष किमतीच्या १४ विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शहरातील विविध प्रभागातील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, आर. सी.सी. गटार बांधणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, खुल्या जागेत सिमकॉल्स लेन बसविणे, रेल्वे स्टेशन जवळ वाहनतळ विकसित करणे आदी विविध कामांचा यात समावेश होता.

यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, नगरपालिका नगरसेवक शेखर बजाज, घृष्णेश्वर पाटील, विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार, संजयआबा राजपूत, नानाभाऊ कुमावत, सोमसिंग राजपूत, नितीन पाटील, आनंद खरात, रोशन जाधव, अरुण अहिरे, बाळासाहेब मोरे, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दीन शेख, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, गणेश महाले, भूषण ब्राह्मणकर, दीपक पाटील, विश्वास चव्हाण, प्रा.ए ओ पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भाजयुमो शहराध्यक्ष अक्षय मराठे, चंद्रकांत पाखले, राकेश बोरसे, संभाजी घुले, अमोल नानकर, भरत गोरे, कैलास गावडे, प्रा.सुनील निकम, सुशील वानखेडे, प्रदीप राजपूत, विजय जाधव, योगेश गव्हाणे, अमित सुराणा, कपिल पाटील, मनोज पाटील, गणेश सोनार, हर्शल चौधरी, बबडी शेख, शुभम पाटील, भावेश कोठावदे, गौरव पुरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*