चार महिन्यात दिड कोटीचा मुद्देमाल जप्त

0
राज्य उत्पादन शाखेची कारवाई
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात राज्य उत्पादन शाखेने केवळ 14 अधिकार्‍यांच्या जोरावर गेल्या चार महिन्यात 757 गुन्हे दाखल केले असून 269 आरोपी अटक केले आहेत. 257 जणांना बेड्या ठोकल्या असून 480 बेवारस वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
या 120 दिवसांच्या कालावधीत दिड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन कार्यकारी निरीक्षक व 11 दुय्यम निरीक्षक इतक्या मनुष्यबळावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
जिल्ह्यात पंगरमल येथे दारूकांड घडल्यानंतर त्याचे पहीले खापर राज्य उत्पादन शुल्कच्या माथी मारण्यात आले. या शाखेत संपुर्ण जिल्ह्यासाठी केवळ 28 ते 30 कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ आहे. त्यामुळे श्रीरामपुर, संगमनेर व नगर या शाखेमध्ये कर्मचार्‍यांचे विभाजन कसे करावे हा प्रश्‍न अधिकार्‍यांसमोर असतो. असे असून देखील राज्य उत्पादन शाखेच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मोठी कामगिरी करुन दाखविली आहे.
ही कारवाई लक्षात घेता राज्यात तीन ते चार नंबरला जिल्ह्याचा क्रमांक लागतो आहे. त्यामुळे त्यांच्या कारवाईचा विचार करता पांगरमल घटनेत त्यांच्यावर खार खाऊन असलेल्यांच्या आरोपाला न जुमानता त्यांच्या कार्यकर्दीवर मुख्यमंत्र्यांनी देखील प्रश्‍न उपस्थित केला नाही. सन 2016 ते 17 या कालावधीत महसुलचे उद्दी 1200.49 होते.त्यात 1312 कोटी इतके उदि पुर्ती करण्यात आली आहे.
2015 ते 17 या कालावधीत 245 विभागीय नियमभंगाची प्रकरणे दाखल करण्यात आली होती. ती निकाली काढत एक कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या दरम्यान 91 वाहने जप्त करण्यात आली असून मद्याचा कोट्यावधी रूपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच ताडी विक्री करणार्‍या 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खरे तर जिल्ह्यात 30 पोलीस ठाणे आहेत. त्यात पाचशे पेक्षा जास्त अधिकारी व साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. एका पोलीस ठाण्यात किमान 40 कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. असे असून देखील पोलीस ठाण्याच्या मार्फत वर्षभरात केवळ एक हजार 900 च्या जवळपास मद्यावर कारवाई तर तोडका मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
तर राज्य उत्पादन शाखेत केवळ 28 कर्मचारी असून अडीच हजाराच्या वर कारवाई व कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जाम करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अकोले, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपुर, नगर शहर, श्रीरामपुर तालुका या ठिकाणांवरुन पोलीस संरक्षणात मद्याचा पुरवठा केला जात असल्याचे बोलले जात आहे.
सर्वाधिक मद्याचा पुरवठा हा नाशिक जिल्ह्यातील घोटी व नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथून मद्याचे वितरण आजही सुरक्षीत रित्या होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पोलीस अवैध मद्य विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होत आहे.
मात्र हे सर्व एकाच माळेचे माणी असून अर्थपुर्ण तडजोडीतून साध्या हॉटेलमध्ये देखील दारू विकली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनावर विश्‍वास न ठेवता ग्रामसुरक्षा दल सक्रीय होण्याची गरज निर्माण झाली आहे.
आता जागा देणार्‍यावरही कारवाई
अवैध मद्य विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी नाही. तरी देखील परवाना धारकांकडून काही व्यवसायीक मद्य घेऊन जातात व त्याची छूपी विक्री करतात. तसेच काही ठिकाणी मद्य पिणार्‍यांना खोल्या, हॉटेल, गाळे दिले जातात. असे प्रकार लक्षात आले आहे. त्यामुळे मद्य विक्री करणेल किंवा मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे, किंवा अवैध मद्य विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहीती भाग्यश्री जाधव यांनी दिली.

….तर परवाने निलंबित करण्यात येईल
आम्ही अवैध धंद्यांना लक्ष केले आहे. जिल्हाभर मोठी कारवाई सुरू आहे. यात सद्या ग्रामसुरक्षा दल सक्रीय होणे अपेक्षीत आहे. परवाना धारकांकडून अन्य ठिकाणी मद्याचा पुरवठा केला जाऊ नये यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परवाना धारकांना अशा प्रकारच्या सुचना करण्यात आला आहेत. जर त्याचे उल्लंघन झाले तर अशा दुकानांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहे. नागरिकांनी व्हाटसऍप पोर्टलवर 215 तक्रारी केल्या होत्या. त्यातील 5 तक्रारी वगळता 210 समस्यांचे निरसण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी 8422001133आमच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.
– भाग्यश्री जाधव-खेतमाळीस (राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक)

2013 मध्ये 1865 गुन्हे, 77 लाख 46 हजार मुद्देमाल
2014 मध्ये 1988 गुन्हे, 2 कोटी 54 लाख 44 हजार मुद्देमाल
2015 मध्ये 2240 गुन्हे, 2 कोटी 34 लाख मुद्देमाल
2016 मध्ये 2407 गुन्हे, 2 कोटी 13 लाख 94 हजार मुद्देमाल
2017 चे 4 महिने 757 गुन्हे, 1 कोटी 44 लाख 84 हजार मुद्देमाल

LEAVE A REPLY

*