चार्‍यासाठी गाईंचा हंबरडा…

0

गोरक्षगडावरील गोशाळेत, चाराटंचाई; दानशूरांना आवाहन

दात्यांची संख्या घटल्याने अडचण
गोहत्या बंदी झाल्यामुळे अनेकांनी आपल्या गायी गोशाळेत आणून सोडल्या आहेत. या गोशाळेत 80 गायी आहेत, त्यातील बहुतांशी गाया गावरान आहेत.पावसाळ्यात व हिवाळ्यात चार्‍याची कमतरता भासत नाही. मात्र उन्हाळ्यात डोंगरावरील गवत वाळून जात असल्याने चारा शिल्लक राहत नाही. अलिकडे दात्यांची संख्या घटल्याने अडचण निर्माण झाली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थानच्यावतीने गोशाळा चालविण्यात येत आहे. यंदा चार्‍याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गोशाळेत असणार्‍या गायांसाठी चार्‍याची व्यवस्था करणे  मुश्किल झाले आहे. दानशूर व्यक्तींनी या गोशाळेला चारा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगरपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ मंदिर असून येथे वर्षभर धार्मिक उपक्रम राबविले जातात. राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केल्यानंतर अनेक पशुपालकांनी आपल्या गायी येथील गोशाळेत आणून सोडल्या आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दानदात्यांच्या भरवशावर ही गोशाळा चालविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात दानदात्यांची संख्या कमी झाल्यामुळे देवस्थानला गायींना सांभाळणे कठीण झाले आहे.
डोंगरावर चरत असल्याने चारा विकत आणावा लागत नाही. पण उन्हाळ्याच्या एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात चारा टंचाई जाणवते. तुलनेने देवस्थानचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे देवस्थानला तारेवरची कसरत करावी लागत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे तसेच आपला वाढदिवस व लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन या गोशाळेसाठी मदत करावी असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*