चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुर्‍हाडीने वार : पतीची आत्महत्त्या

0

शहादा । दि.10 । ता.प्र.- चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमधील वाद टोकाला जावून पतीने पत्नीच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने गंभीर जखमी झाली आहे.

तिला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर पतीने पलायन करीत घराच्या मागच्या बाजूस असलेल्या शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. येथील सालदार नगरमध्ये रात्री दीड वाजेच्या सुमारास परमार कुटुंबात ही घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूना प्रकाशा रोडनजीक सालदारनगरमध्ये पालिकेचे नाक्यानजीक सुरेश लालजी पवार (वय 38) हे पत्नी रेखा सुरेश परमार (वय 35) व तीन लहान मुलांसह राहतात.

या कुटुंबात पती-पत्नीमध्ये नेहमीच खटके उडत होते. रेखा पवार ही पतीस तीनचार वेळा काही न सांगता माहेरी निघून गेल्यामुळेही दोघांमध्ये वाद होत होता.

काल रात्रीही चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद वाढतच जावून संतापाच्या भरात सुरेश परमार याने रेखा हिच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले.

रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात रेखा पडल्याने मुलांनी आरडा-ओरडा केल्याने शेजार्‍यांनी तिला शहादा पालिका रूग्णालयात दाखल केले. तेथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला धुळे जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून मृत्यूशी झुंज देत आहे.
दरम्यान, पती सुरेश परमार याने घटनेनंतर पलायन करीत घराच्या मागील बाजूस पंडीत जगन्नाथ गुरव यांच्या शेतातील झाडास गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले.

मुक्तार ईब्राहीम खाटीक यांनी घटनेची खबर पोलीसात दिली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तपास हे.कॉ.मनोज सरदार करीत आहेत.

LEAVE A REPLY

*