चारित्र्याच्या संशयातून भररस्त्यात पत्नीला पेटविले

0

ठाणे /कल्याण-मुरबाड रोड स्टेट बँके समोर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे कल्याण चांगलेच हादरले.

पत्नी आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा वादातून तिच्या पतीने तिला रात्रीच्या सुमारास भररस्त्यात पेटवून दिले.

यात ही विवाहिता गंभीर असून तिला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनीता वाघमारे असे होरपळलेल्या महिलेचे नाव आहे.

पतीने आपल्या पत्नीला पेटविल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तात्काळ या महिलेला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पप्प्या व सुनीता वाघमारे हे दाम्पत्य कल्याणमधील फुटपाथवर राहत असून मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

सुनीताला आपला पती पप्प्या याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत.

हा वाद सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उफळून आला. कल्याण-मुरबाड रोडवरील स्टेट बँके समोरील फुटपाथवर हि घटना घडली

 

LEAVE A REPLY

*