चांदवड तालुक्यात सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

0

चांदवड| तीसगाव (ता. चांदवड) येथील पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. येथील प्रतिक बाळू जुंदरे हा आपल्या घराजवळ खेळत असतांना त्याला सर्पदंश झाला.

सदर प्रकार पालकांच्या उशीरा लक्षात आला त्यांनी लागलीच त्याला चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविले.

मात्र, रूग्णवाहिका पिंपळगाव (ब) नजीक असतांनाच प्रतिक याची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*