चप्पल गोदामास भीषण आग,५ गोदामे जळून खाक

0

ठाणे/अरिहंत कंपाऊंड येथील कॅटवॉक या सुप्रसिद्ध चप्पल, बूट बनवणार्‍या कंपनीच्या गोदामास भीषण आग लागली.

या आगीत 5 गोदामे जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचा माल आगीत जळून खाक झाला आहे.

या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग—ामपंचायत हद्दीत ही गोदामे होती.

या आगीची माहिती भिवंडी अग्निशामक दलास पोलीस नियंत्रण कक्षाने कळवल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

परंतु, आग पहिल्या मजल्यावर लागली असल्यामुळे इमारतीच्या बाहेरून खिडक्यांचे तावदान तोडून तेथून पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न करावा लागला.

आगीची व्याप्ती पाहता पोलिसांनी भिवंडी अग्निशामक दलाच्या मदतीकरीता कल्याण, उल्हासनगर, ठाणे येथील अग्निशामक दलाची मदत मागून घेतली.

या ठिकाणी अग्निशामक दलाचे प्रमुख आणि नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  आणि मोठा पोलीस बंदोबस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*