Type to search

जळगाव

चंद्रपूरला विक्रीसाठी जाणारी 39 हजाराची देशी दारु रेल्वे पोलीसांनी पकडली

Share

जळगाव । शहरातील कंजरवाडा परिसरातून चंद्रपूर येथे विक्रीसाठी जाणारी 39 हजार रुपयांच्या देशी दारुची वाहतूक करणार्‍या तरुणाला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे मिळून आलेल्या 8 बॅगमध्ये 1 हजार 500 देशी दारुच्या बाटल्या होत्या. या संशयितांला पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान नेहमी रेल्वेने चंद्रपूर येथे दारु विक्रीसाठी जात असल्याचे समोर आले.

कंजरवाडयातील रहिवासी मोनू मदन भाट वय 28 हा जळगाव येथून चेन्नई एक्सप्रेसमध्ये देशी दारु चंद्रपुर येथे घेवून जात होता. यावेळी त्याच्याकडे सुमारे आठ प्रवासी बॅगा असल्याने तो फ्लाट क्रमांक 5 वर उभा होता. दरम्यान रेल्वेच्या पोलिसांना मोनू हा संशयीत रित्या रेल्वेस्थानकावर उभा असल्याची गुप्त माहिती पोलिस उपनिरीक्षक जी.एस. घिगे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ निलेश अढवाल, रिबन अहमद, प्रमोद सांगळे, विक्रम वाघ, निलेश गिरासे यांचे पथक तयार करुन संशयीत रित्या उभ्या असलेल्या मूोन याची चौकशी करीत त्याच्याकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली. या आठ प्रवासी बॅगांमध्ये 39 हजार रुपये किंमतीच्या सुमारे 15 बॉक्समध्ये असलेल्या 1500 नग दारुच्या बाटल्या आढळून आल्या. रेल्वे पोलीसांनी पंचनामा करून संशयित मोनू भाट याला पुढील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!