Type to search

धुळे

चंद्रग्रहणामुळे आज एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद

Share

धुळे । गुरूपोर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दि. 16 जुलै रोजी दुपारी चार वाजेपासुन खान्देश कुलस्वामीनी एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.

गुरूपोर्णिमेनिमित्त खान्देश कुलस्वामीनी एकविरा देवी मंदिरात उद्या दि. 16 जुलै रोजी सकाळी 8 वाजता आरती होईल. त्यानंतर पुजा करून अभिषेक करण्यात येईल. सकाळी 11.30 वाजता देवीला महानेवैद्य दाखविण्यात येईल. दुपारी बारा वाजता महाआरती होईल. तसेच दुपारी 12.30 वाजता मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप होईल.

खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे उद्या दि. 16 जुलै रोजी दुपारी चार वाजेपासुन एकविरा देवी मंदिर बंद राहील. सायंकाळी 6 वाजता तसेच रात्री 10 वाजता होणारी आरती होणार नाही. तसेच दि. 17 जुलै रोजी पहाटे 5 वाजता मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात येईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!