चंद्रकांत गवळी राज्य राखीव दलाचे समादेशक

0

धुळे / जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक यांची धुळ्याहून औरंगाबाद येथे बदली करण्यात आली होती.

मात्र, ही बदली रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा धुळ्यात सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

अधीक्षक एस.चैतन्य आणि अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी या दोन्ही अधिकार्‍यांची एकाचवेळी बदली करण्यात आली.

त्यानंतर नवीन अधीक्षक एम.रामकुमार आणि अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पद्भार घेतला.

नवीन अधिकार्‍यांचे स्वागत करुन चंद्रकांत गवळी आणि एस.चैतन्य यांनी धुळेकरांचा निरोप घेतला.

मात्र, राज्य शासनाच्या गृह विभागाने आज दि.4 रोजी आदेश काढून चंद्रकांत गवळी यांची औरंगाबाद पोलिस अधीक्षकपदी झालेली बदली रद्द केली आहे.

त्याऐवजी धुळे येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र.6 च्या समादेशकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गवळी यांची कार्यपध्दती धुळेकरांच्या पसंतीस उतरली असल्याने आणि तीन वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी या ठिकाणी काम पाहिलेले असल्याने त्यांची पुन्हा धुळ्यात झालेल्या पदस्थापनेचे स्वागत केले जात आहे.

LEAVE A REPLY

*