चंदू चव्हाण उद्या आपल्या गावी परतणार ; संरक्षण राज्यमंत्री स्वतः येणार सोबत

0
नवी दिल्ली : नजर चुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून २१ जानेवारीला सुटका झाली. पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर उद्या धुळ्यात परतणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला घेऊन धुळ्यात आणणार असल्याची माहिती प्राप्त होते आहे.
29 सप्टेंबरला नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेलेलाचंदू चव्हाणची 21 जानेवारीला पाकिस्तानने सुटका केली होती. दरम्यान, भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान, त्याच्यावर उपचारही सुरु होते. अखेर चंदू उद्या आपल्या गावी परतणार आहे.

चंदू मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा असून 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे.  जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे.

चंदू चव्हाण स्वागतासाठी धुळेकर  उत्सुक

  • ११ मार्चला  विशेष मिरवणूक
  • ना. डॉ. सुभाष भामरेंच्या प्रयत्नाला अभूतपूर्व यश

 

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या जवान चंदू बाबूलाल
चव्हाण याला घेऊन  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यात दाखल होणार आहेत. उद्या ११ मार्च रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास त्यांचे नागांवबारी, धुळे येथे आगमन होईल.

सबंध धुळेकर जनतेच्या समवेत भव्य मिरवणुकीने जि.टी.पी. चौक- नेहरू चौक – मोठा पूल – मार्गे महात्मा
गांधी पुतळा येथे मिरवणूक मार्गक्रमण करेल. महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक फुलवला चौक – कराचीवाला खुंट – शहर पोलीस चौकी – पाचकांदिल – खंडेराव बाजार मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मिरवणूक पोहोचेल व छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करून मिरवणुकीचा समारोप होईल. अशी माहिती भाजपा चे महानगर जिल्हाध्यक्ष श्री अनुप अग्रवाल यांनी दिली.

LEAVE A REPLY

*