चंदिगड : नेहा धुपियाच्या कारला अपघात

0

‘नो फिल्टर नेहा’ शोचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून शोच्या प्रमोशनसाठी नेहा धुपिया चंदिगड येथे पोहोचली.

प्रमोशननंतर चंदिगडहून परतताना नेहाच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली नाही.

मात्र धक्कादायक म्हणजे, तेथे लोकांनी तिची मदत न करता सेल्फी काढला.

काहींनी तर चक्क तिला ऑटोग्राफचीही मागणी केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.

मुंबईला परतण्यासाठी नेहा चंदीगड विमानतळाकडे जात होती. मात्र मध्येच तिच्या कारचा अपघात झाला. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली होती.

त्यामुळे एक तासाहूनही अधिक वेळ नेहाला अपघातस्थळीच अडकून राहावं लागलं होतं.

सुदैवाने नेहा आणि तिच्यासोबत कारमध्ये असणाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नाही. नेहाच्या खांद्याला किरकोळ जखम झाल्याची माहिती मिळतेय.

LEAVE A REPLY

*