घोटीजवळ प्रेमीयुगलाची रेल्वेखाली आत्महत्या

0

इगतपुरी  : इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील एका प्रेमीयुगलाने आज पहाटे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोकून  आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील गि-हेवाडीच्या राजेश नामदेव गांगड (वय२०) व पुजा गणपत गि-हे  (वय. १७) या प्रेमीयुगलानी काल मध्यरात्री घरातून पळून जात पायी घोटीजवळ रेल्वे रुळाकडे येत रेल्वे रुळावर झोपून मुंबई कडे जाणाऱ्या  धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेची माहिती आज सकाळी काही पादचाऱ्यांना समजताच त्यानी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, चालक प्रधान हवालदार रामदास गांगुर्डे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत दोन्ही मृतदेह इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातलगाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*