Type to search

जळगाव

घरफोडीतील संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

Share

जळगाव । शेरा चौकातील कुटुंबिय घरात झोपलेले असतांना मोबाईल व रोकड लांबवून नेणार्‍या संशयिताच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. या चोरट्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शेरा चौक परिसरातील रहिवाशी मोहम्मद आरिफ अब्दुल रहेमान हे घरात झोपलेले असतांना त्यांच्या घरातून चोरट्याने मोबाईल व पैसे चोरुन नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रविंद्र गिरासे, अशोक महाजन, विजय पाटील, सचिन महाजन, बापू पाटील, नंदलाल पाटील यांनी शेख मोसीन उर्फ शेख हनिफ वय 22 रा. शेरा चौक याला पांडे डेअरी चौक परिसरातून अटक केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!