घरफोडीतील अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

0
जळगाव । दि.13। प्रतिनिधी-घरफोडीसह फसवुणीच्या गुन्ह्यातील सराईत असलेल्या गुन्हेगारांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पदार्फाश केला.
अटक करण्यात आलेल्या दोघांकडून सुमारे 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा व भडगाव परीसरात गेल्या चार महिन्यापासुन पैसे दुप्पट करुन देण्याचे आमीष देवुन गंडविणारी टोळी सक्रिय झाली होती. तसेच घरफोडी करुन सुमारे 7 लाख 50 हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा समांतररित्या तपास करीत असतांना पोनि. राजेशसिंह चंदेल यांना संशयीतांची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोनि.चंदेल यांनी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिलीप येवले, शशिकांत पाटील, विनोद पाटील, संजय सपकाळे, संजय पाटील, अशोक चौधरी, रविंद्र पाटील, विलास पाटील, युनूस शेख, दिपक पाटील, गफ्फारखाँ तडवी, दत्तात्रय बडगुजर, विनयकुमार देसले, अन्नपूर्णा बनसोडे, शैला एळीस, गायत्री सोनवणे, छाया मराठे अश्यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने भडगाव येथून रज्जाक वजीर तडवी, गोपी मल्लु गौंड या दोघांना अटक केली. दोघांकडून 1 लाख 45 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*