घरकुल वसुली सुनावणीला महिनाभराची मुदत

0

जळगाव |  प्रतिनिधी : घरकुल योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी ४८ नगरसेवकांकडून घरकुलची प्रत्येकी १ कोटी १६ लाखाची वसुलीप्रकरणी आज आयुक्तांकडे सुनावणी झाली. यावेळी नगरसेवकांकचे वकील अड.डि.एच. परांजपे यांनी आयुक्तांना सुनावणीचे अधिकार आहेत का नाही? यावर कोर्टात सुनावणी असल्याने निर्णयापर्यंत थांबावे अशी मागणी केली. तसेच तत्कालीन स्विकृत नगरसेवकांची नावे वगळण्याची मागणी केली. आयुक्तांनी यासाठी महीन्याची मुदत दिली.

सुनावणीसाठी आज बुधवारी सकाळी १० वाजता आयुक्ताच्या दालनात बोलविण्यात आले होते. आयुक्त जीवन सोनवणे, लेखा परिक्षक डि.आर.पाटील, अनिल बिर्‍हाडे व रविंद्र कदम सुनावणीसाठी उपस्थित होते.

सर्व ४८ तत्कालीन नगरसेवकांचे सुनावणीसाठी वकीलपत्र ऍड. डि.एच.परांजपे यांनी घेतले आहे त्यामुले सुनावणीसाठी परांजपे उपस्थित होते. वसुलीची सुनावणी घेण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना नाहीत तर ते विभागीय आयुक्तांना आहेत. असा आक्षेप घेवून नगरसेवक कोर्टात गेले आहेत.

तो पर्यंत थांबावे अशी मागणी ऍड. परांजपे यांनी केली. तसेच स्विकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांची नावे वगळावीत असेही त्यांनी सांगीतले.आयुक्तांनी बाजूऐकून घेतल्यानतंर सुनावणीसाठी महिन्याची मुदत देण्यात आली.

LEAVE A REPLY

*