Type to search

जळगाव

घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर 18 ला कामकाज

Share

जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी कामकाज होऊ न शकल्याने आता पुढील कामकाज 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

घरकुल घोटाळ्यातील आरोपींना धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी निकालाला स्थगिती मिळावी तसेच जामीन मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपींठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवार दि. 16 रोजी न्यायमुर्ती तानाजी नलावडे याचेंसमोर कामकाज घेण्यात आले. यावेळी न्यायमुर्तीनी काही शंका उपस्थित केल्या. यावेळी पुरेश्या माहिती अभावी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमोल सावंत यानां शंकाचे निरसन करता न आल्याने त्यांनी उत्तरे देण्यासाठी वेळ मागुन घेतल्यामुळे या प्रकरणात पुढील कामकाज 18 रोजी ठेवण्यात आले आहे. दरम्यान या सुनावणीकडे शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागुन आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!