Type to search

धुळे

घनकचरा संकलनात हलगर्जीपणा केल्यास दंड

Share

धुळे । वॉटर ग्रेस प्रॉडक्ट नाशिक या संस्थेचे वाहनचालक व मजूर यांनी सकाळी साडेसहा वाजता हजेरीसाठी उपस्थित राहून सकाळी सात वाजता घनकचरा संकलनाचे घरस्तरावर काम सुरू करावयाचे आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा केल्यास संबंधित वाहनचालक व मजूर यांना उशिरा आल्याबद्दल प्रत्येकी शंभर रुपये दंड करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी दिले आहेत.

महापालिकेचे घनकचरा संकलन वाहतुकीचे काम वॉटर ग्रेस प्रॉडक्ट नाशिक या संस्थेस विहित निविदा प्रक्रिया करून कमी दराची निविदा म्हणून देण्यात आलेली आहे. सुमारे चार महिन्यापासून सदरची संस्था काम करीत आहेत.

शहराची व्याप्ती लक्षात घेता घनकचरा संकलन व वाहतूक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेने मंजूर डीपीआर अंतर्गत 79 घंटागाड्या खरेदी केलेले आहेत सदरच्या घंटागाड्या संबंधित कंपनीला प्रति  टन कचरा संकलन व वाहतूक करता दिलेले आहे. सदरची निविदाही ही प्रतिटन वजनावर असल्यामुळे घनकचरा संकलनाचे  कामाचे देयक वजनावर देण्यात येत आहे.

महापालिकेने स्वतःच्या मालकीचा वजन काटा गांडूळ खत प्रकल्प येथे सुरू केलेला आहे. सदर संस्थेच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी असून त्या अनुषंगाने संस्थेच्या कामात वर नियंत्रण ठेवण्यासाठी  महापौर व आयुक्त यांनी विभागास सक्त निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने आज सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी अशोक नगर येथील संबंधित कंपनीच्या वाहन स्थळाला सकाळीच साडेसहा वाजता भेट दिली असता सदर ठिकाणी वाहनचालक व मजूर वेळेत उपस्थित नसल्यामुळे संबंधित सुपरवायझर व कंपनीचे अधिकारी यांना सक्त निर्देश दिले. वाहनाचे लॉग बुक व इतर अनुषंगिक बाबी तपासून घंटागाडी वेळेवर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिली.

तसेच संबंधित कंपनीचे वाहनचालक व मजूर यांनी सकाळी साडेसहा वाजता सदर ठिकाणी हजेरीसाठी उपस्थित राहून सकाळी सात वाजता घनकचरा संकलनाचे घरस्तरावर काम सुरू करावयाचे आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधित कंपनी वाहनचालक व मजूर यांना उशिरा आल्याबद्दल प्रत्येकी शंभर रुपये दंड करणार असल्याबाबत संबंधित व्यवस्थापनाने सांगितलेली आहे. घन कचरा संकलन करत असतांना वाहन चालकाने ओला व सुका कचरा विभक्त करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून अशा स्वरूपाचा कचरा संकलित करणे अपेक्षित आहे. याबाबत अनियमितता आढळल्यास संबंधित कंपनी करारनाम्यातील अटीशर्तीचा भंग केल्यामुळे कारवाई केली जाईल असे सक्त सूचना संबंधित व्यवस्थापनात दिल्या. भेटीदरम्यान सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे हे उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!