ग्राहक जागृत झालेला नाही – प्रा.शिवाजी अहिरराव

0

एरंडोल, | प्रतिनिधी :   वर्षातून दोन दिवस महसूल विभागाकडून ग्राहक दिन साजरा करण्यात येतो परंतु त्या दिवशीही ग्राहक या दिवसाकडे पाठ दाखवतात हि मोठी खेदाची गोष्ट असून अजूनही ग्राहक जागृत झालेला नाही असे प्रतिपादन आज दि.१५ मार्च रोजी एरंडोल तहसील कार्यालयाच्या आवारात आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रा.शिवाजी अहिरराव हे बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पो.नि.बाळासाहेब केदारे,नगराध्यक्ष रमेश परदेशी,रवींद्र पाटील हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला प्रांताधिकारी,तसेच आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासह अनेक विभागाचे अधिकार्यांनी पाठ ङ्गिरवल्याचे चित्र होते.दरम्यान सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी,रवींद्र पाटील,पद्मालय ग्यास इजन्सी चे संचालक अशोक पाटील आदींचे समयोचित भाषणे झाली.यावेळी ग्राहक कमी व रेशन दुकानदार जास्त होते.यावेळी प्रशानाकडून ग्राहक दिनाचे योग्य नियोजन केले जात नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.

तसेच ग्राहक दिन हा ङ्गक्त औपचारिकरित्या पाळला जात असल्याचेही यावेळी बोलले गेले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सुनिता जर्हाट यांनी केले.तर सुत्रसंचलन व आभार विलास मोरे यांनी मानले.

यावेळी लक्ष्मण ठाकुर,भानुदास आरखे,प्रमोद महाजन,अश्ङ्गाक बागवान,दशरथ चौधरी,निंबा बडगुजर,कल्पना लोहार तसेच रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी निवासी नायब तहसीलदार आबा महाजन,सं.गा.यो.चे नायब तहसीलदार आबा ठाकुर,किशोर उपचार्य,पी.बी.देवराज,भिमराव सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*