ग्राहकांसाठी चोपड्यात एटीएमची सुविधा २४ तास द्या! – पी.के.दलाल

0

चोपडा, |  प्रतिनिधी :   चोपडा शहरात दहा ते पंधरा एटीएम मशीन असले तरी नोटबंदी नंतर एकही एटीएम सुविधा ग्राहकांना व्यवस्थित मिळत नसून मोठी गैरसोय होत असून ती सुविधा २४ तास पुरवा अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायतीचे सहसंघटक प्रकाश दलाल यांनी सांगितले.

जागतिक ग्राहक दिना निमित्त चोपडा तहसील कार्यलयावर ग्राहक महोसत्वाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायतीचे सहसंघटक प्रकाश दलाल,प्रमुख वक्ते म्हणून बँक ऑङ्ग इंडिया शाखेचे प्रबधक केतनकुमार बोन्डे,जेष्ठ मार्गदर्शक व्ही सी गुजराथी,तहसीलदार दीपक गिरासे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील,पुरवठा तपासणी अधिकारी महेश साळुंके,व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव,ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अनिल पालिवाल,अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील,अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक प्रवीण रमेश पाटील,तालुका सह संघटक निलेश पालिवाल,नगरसेवक महेंद्र धनगर,टेलिङ्गोन विभागाचे  सुधीर निकम,उपस्थित होते.

या ग्राहक मंचाच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील यांनी इंटरनेट द्वारे ग्राहकांची ङ्गसवणूक कशी होते,ती कशी टाळता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी सायबर गुन्ह्यात ग्राहकांची कशी ङ्गसवणूक केली जाते याबाबत माहिती दिली.

अमृतराज सचदेव यांनी व्हॅट कर बाबत माहिती दिली.बँक ऑङ्ग इंडिया शाखेचे प्रबधक केतनकुमार बोन्डे यांनी बँकेतील विविध योजना आणल्या त्या ग्राहकांसाठी ङ्गायद्याचा असून त्याचा लाभ घ्यावा.बँकेत एटीएम मध्ये पैसे काढताना आपला एटीएम पासवर्ड कोणाला समजू देऊ नका,असे सांगितले.

तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले की,यापुढे आता ग्राहक साठी ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे.ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी बिल,पावती घेतलेली केव्हाही ङ्गायद्याची असते.

तर पी के दलाल यांनी सांगितले की अनेक ग्राहकांवर अन्याय होत असताना देखील ग्राहक संघटित नसून त्याच्या ङ्गसवणुकीचे प्रकार थांबत नाहीत.दुकानावर एकदा विकलेला माल परत मिळणार नाही,आम्ही विक्रेते असून निर्माते नाहीत असे बोर्ड चुकीचे असून अश्या दुकानंदारावर कारवाई केली पाहिजे.

ग्राहक सरक्षणाचे कायदे ग्राहकांनी अवलंबले पाहिजेत.आपल्यावर अन्याय झाला असेल तर ग्राहक संरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून न्यायलायत दाद मागू शकतो असेही दलाल यांनी सांगितले.

यावेळी बँकेचे अधिकारी व टेलिङ्गोन विभागाच्या अधिकारय्या समोर अनेकांनी आपल्या तक्रारी मांडल्या होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल पालिवाल यांनी केले होते.

LEAVE A REPLY

*