ग्रामीण भाग हगणदारी मुक्त कधी होणार…?

0

शासनाने गाव हागणदारी मुक्ती साठी विविध प्रकारच्या उपाय योजना सुरू केल्या या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने अंबलंबजावणी सुध्दा केली गेली मात्र नागरिकांच्या विशेषतः हा ग्रामीण भागातील महिला व नागरीक यांच्या उदानसिनते मुळे महाराष्ट्र तील काही काही ग्रामीण भागात आज ही महिला व पुरुष शौचालय उघड्या वरच जात असल्याने शासनाच्या ह्या हागणदारी मुक्त गाव या योजनेचा एक प्रकारे फज्जा झाला असल्याचा दिसून येत आहे..

शासनाची? का नागरिकांची उदासिनता? नेमकी कोणाची उदानसिन ता म्हणावी असा प्रश्न उपस्थित होत आहे या उघड्या वरती शौचालयास बसणार्‍याना का जबाबदार धरू नहे? का यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करू नहे? का याना वाटत नाही की आपण उघड्यावर शौचालय न बसता आपल्या दारी शौचालय बांधून त्याचा वापर करून आपले गाव रोग मुक्त करू या? कधी बदलणार ही मानसिकता? असे बरेच गाव आहेत की, गावात शौचालय आहे की शौचालयात गाव आहे? हा प्रश्न या गावात गेले की उपस्थित होतो. हे गाव चक्क हगणदारी च्या उचांक तर गाठणार ना ? या गावांना हगणदारी युक्त गावाचा पुरस्कार मिळणार तर नाही ना? असे गंभीर विचार या गावत गेले की उपस्थित होतो.

अशी भयानक या गावाची आज ची स्थिती निर्माण झाली आहे, शासनाच्या योजना फक्त कागदावर नाचत आहे गाव येण्या च्या आगोदर दुर्गंधी आली की समजून जावे गाव आले. शासनाने घरोघरी शौचालय यासाठी भरीव अनुदान दिले ही पण ते फक्त खात्यावर पैसे जमा झाला व दारी शौचालय न बांधता इतर कमी खर्च ही झाला पण शौचालय काही झालेच नाही राव कागदावर त्या शौचालय चे फोटो. आशा या गाव पुढार्‍यांच्या, शासनाच्या भोंगळ कारभाराणे, सर्व या योजनेचा फज्जा उडताना दिसत आहे. शासनाने या अगोदर सकाळी च गूड मॉर्निंग पथक नेमले, उघड्यावर शौचालय करणार्‍या ना गुलाबाची फुले ही दिले, टमरेलसुध्दा जमा केली, तरी आज जैसे थे स्थिती आहेच.

असे उपक्रम राबविण्या पेक्षा शासनाने जर उघड्या वर शौचालय करणार्‍या ना शिक्षा म्हणून त्याच्या नावावर वर्षाला येणारी घर पट्टी किंवा पाणी पट्टी दुप्पटीने आकारली तर कुठे तरी चाप बसेल व महसूल ही जमा होण्यास मदत होईल व गावाच्या विकासासाठी या जमा झालेल्या महसुलाचा वापर ही होईल. उघड्या वरती शौचालयस बसल्यांमुळे गावात विविध प्रकारच्या आजारांना आपण हुन आमंत्रण देत आहेत, या उघड्यावर शौचालय करण्याने त्या शौचालय ची काही दिवसांनी राख होऊन तीच राख हवेत व्हायरल होऊन त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होईलच. हे नागरिकांना कधी कळेल? महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाला आहे? या उघड्यावर शौचालयास करणार्‍या भागाचे काय? हा ग्रामीण भाग महाराष्ट्र येत नाही का? का फक्त कागदावर महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाला?

याचे दुषपरिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे, बर्‍याच श्या गावात गाव पुढारी मिशी वरती हात फिरवून गावात गाव मालकान सारखे मीरत असतात व त्याच्या आया बहिणी मुली, बायका, उघड्यावर शौचालय बसतात आणि म्हणे मी गाव पुढारी? त्या उघड्यावर शौचालय बसणार्‍या आपल्या आया, बहिणीला ही शरमेने खाली मान घालून या संकटास ना ईलाज सामोरे लागते व उघड्यावर शौचालय स बसावे लागते. एवढेच नाहीय उघड्यावर शौचालय करण्यामुळे आजकाल एखाद्या मुली चे लग्न करायचे ठरले तर मुली चे वडील मुला कडच्यांना पहिला प्रश्न हा विचारतात तुमच्या कडे दारी शौचालय आहे का?असेल ते ते मुली देत आहे नसेल तर तू नही तो और सही असे अनेक प्रकारचे दिवसेंदिवस प्रश्न उपस्थित होत आहे व असे प्रश्न मुलींवाल्यानी जरूर विचारायालाच हवे.

तेव्हा कुठं ही बेजबाबदार नागरिक सावध होतील यात संबंधित अधिकारी ही तितकेच जबाबदार आहेत. हे अधिकारी यंत्रणेच्या भरवशा वरती राहतात. होतोय महाराष्ट्र हंगनदारी मुक्त तर कुठून होतोय? त्या सरकारी एसी रूम मध्ये बसून. यांनी कधी गावोगावी प्रत्यक्ष भेट देऊन व पाहणी केलीच नाही. तर ही गावे हंगनदारी मुक्त कसे होईल? इथं तर कुंपणच शेत खातय? या वर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे, लाऊडस्पीकर किंवा गावात दवंडी देऊन गावे काही हंगनदारी मुक्त होणार नाही, तरी या वर गंभीर उपाययोजना नाही केल्यास भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल.
(खंडाळा)
मो. 8975183673
– हर्षल अशोक पाटील

LEAVE A REPLY

*