Type to search

ग्रामीण भागात विकासकामांना प्राधान्य -राहुल रंधे

Share

बोराडी | आदिवासी भागातील नागरिकांचा मुलभुत विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून खेडयापाडयातील रस्ते हे शहराला जोडली जात आहे. त्याच बरोबर गावातील रस्ते, गल्ली-बोळातील लहान रस्ते देखील कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. याबरोबर रस्त्यावर एईडी लॅम्प लावण्यात येत असून आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागातील आदिवासी गावाचा विकास होत असल्याचे मत भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी व्यक्त केले.

चिंचपाणी येथे ठक्करबाप्पा योजनेंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण व एईडी लॅम्पचे उदघाटन कार्यक्रमात श्री.रंधे हे बोलत होते. यावेळी टेंभापाडा ग्रामपंचायतचे सरपंच चतरसिंग पावरा, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पावरा, जगदीश पावरा, पोलीस पाटील मगन पावरा, अशोक पावरा, मोतीलाल पावरा, बारका पावरा, बबन पाटील भागवत पवार, रविंंद्र शिंदे, दिलीप पावरा, आबास पावरा, चंद्रसिंग पावरा दिपक पावरा, शांतीलाल पावरा, शरद पवार,आप्पा पावरा आदी उपस्थित होते.

भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील गावा-गावांमध्ये विकास कामे केली जात असून या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जलयुक्त शिवार, शौचालय योजना, प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, व्यक्तीगत अपघात विमा, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री जन धन योजना,शेतकरींसाठी अनुदान व जलशिवार योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या त्याचप्रमाणे ठक्करबाप्पा योजनेंतर्गत कॉंक्रिटीकरणाचे काम केले असेे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!