ग्रामसभेच्या माध्यमातून आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न

0

नंदुरबार/ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक खेड्या-पाड्यावरील ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत असून,

ग्रामसभांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला आदर्श गांव बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी निंबोणी येथे केले.

तालुक्यातील निंबोणी येथे समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत गाळ काढणे तसेच गाव विकास परिर्वतन मिशन अंतर्गत महाराष्ट्र दिनी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमास खा.डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आ.सुरुपसिंग नाईक, पंचायत समिती सभापती सविता नाईक, निंबोणी गावाच्या सरपंच सौ.नलिनी कोकणी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्या ममंगळे, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, नवापूरचे तहसिलदार प्रमोद वसावे, अनिल वसावे, शेतकरी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, सविता जयस्वाल, उमा चौधरी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*