ग्रामरक्षक दल स्थापनेची सुरूवात राळेगणसिध्दीपासून सुरू

0

राज्यातील पहिलीच सभा : महिलांची उपस्थिती लक्षणिय

पारनेर (प्रतिनिधी) – अवैध दारूच्या धंद्याबाबत ग्रामीण भागात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचा कायदा पारित करण्यात आला आहे. त्यापार्श्‍वभुमिवर ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी राळेगणसिध्दी येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच ग्रामसभेला महिलांची लक्षणिय उपस्थितीने राज्यातील पहिलीच ग्रामसभा यशस्वी झाली आहे.
पांगरमल दारु दुर्घटनेसारख्या घटना राज्यात कोठेही घडू नये, यासाठी राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दल स्थापण्यात येणार असून सर्वात प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याचे राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
त्यानुसार राज्यातील ग्रामरक्षक दल स्थापनेची सुरूवात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिध्दी येथून सुरूवात झाली आहे. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे होत्या.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मार्गदर्शन केले.

गावांमधील अवैध मद्यनिर्मिती वाहतूक बाळगणे व विक्री इत्यादी बाबतची माहिती पोलीस उत्पादन शुल्क विभागास कळविणे, तसेच गावांमधील मद्यसेवन करणार्‍या मद्यपींना आळा घालण्यासाठी त्याचे समुपदेशन करणे, व्यसनाधिनता रोखण्यासाठी व मद्यप्राशन केल्यामुळे होणार्‍या दुष्परिणामाबाबत लोकशिक्षण व जनजागृती करणे.

पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्‍यांसोबत उपस्थित राहून साक्षीदार म्हणून कायदेशीर प्रक्रियांमध्ये सहकार्य करणे इत्यादी कामे ग्रामरक्षक दलाकडून करण्यात येतील. अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना मिळाल्यास 24 तासांच्या आत कारवाई करण्याचे आदेश आहेत, त्यामुळे महिलांनी आता घाबरण्याचे कारण नसल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.
ग्रामरक्षक दलासंबंधी अण्णा हजारे यांच्या कार्यालयात इतर राज्यातूनही प्रस्ताव आले आहे. तेथील कार्यकर्त्यांकडून ग्रामरक्षक दल स्थापनेसंबंधी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले जात असल्याचे पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांनी सांगितले.

महिलांचा सहभाग ग्रामविकासाची हमी : हजारे
ज्या गावातील लोक ग्रामरक्षक दल स्थापन करण्यास उत्सुक असतील त्या गावात 25 टक्के महिलांनी मतदान करून त्यांची संमती दर्शविल्यास त्या गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात येईल. असे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. यामुळे प्रत्येक गावात महिलांचा सहभाग हा ग्रामविकासाची हमी असेल, या ब्रिद नुसार येत्या महिनाभरात प्रत्येक ग्रामपंचातीने पुढाकार घेण्याचे आवाहन, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. 

राळेगणसिध्दीप्रमाणे इतर गावांनी पुढाकार घ्यावा : सागरे
राज्यातील पहिली ग्रामरक्षक दल स्थापनेची सुरूवात राळेगणसिध्दी गावापासून होत आहे. यावेळी महिला सरपंच रोहीणी हजारे, माजी सरपंच मंगल मापारी, वर्षा हजारे यांनी महिला जनजागृती करून तब्बल 400 महिलांची उपस्थिती होती. ग्रामरक्षक दल स्थापनेसाठी आवश्यक 223 महिलांच्या सह्यांची पडताळणी झाली. प्रत्येक गावात महिलांच्या सहभागातूनच ग्रामरक्षक दलाची चळवळ यशस्वी होईल, तातडीने ग्रामसभा आयोजित करण्याचे आवाहन तहसीलदार भारती सागरे यांनी केले आहे. 

15 जून रोजी मुख्यमंत्री राळेगणसिध्दीत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 15 जुलै रोजी वाढदिवस असून त्यादिवशी पारनेर तालुक्यासह रज्यभरातील स्थापन झालेल्या ग्रामरक्षक दलांसंबंधी माहिती, त्यासबंधीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राळेगणसिध्दी येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

*