ग्रामपंचायत विकासाचे केंद्रबिंदू व्हावे : गुरुमाऊली

0

नाशिक : भारतमाता संपन्न, समृद्ध व्हावी असे वाटत असेल तर खेडी समृद्ध व्हायला हवीत. ग्रामपंचायत विकासाचे केंद्रबिंदू व्हावे. कृषीविषयक योजना, उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त राबवल्या तर खेडी आणि शेतकरी आपोआपच समृद्ध बनतील. यामुळे शेतकरी आत्महत्या निश्चितपणे कमी होतील, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केले. आज शेतकर्‍यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या विचित्र परिस्थितीत शेतकर्‍यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व सेवेकर्‍यांनी काम करायला हवे.

याकरिता आपण हाती घेतलेले ग्राम अभियान अधिकाधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह नेपाळ आणि परेदशातूनही सेवेकरी दाखल झाले होते.

यावेळी सेवेकर्‍यांच्या वतीने आ. सीमा हिरे यांच्या हस्ते गुरुमाऊलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत मोरे आणि नितीन मोरे यांनी सेवेकर्‍यांच्या बैठका घेऊन समर्थ सेवेकर्‍यांचे कार्य घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.

LEAVE A REPLY

*