ग्रंथमित्र पॅनलला ‘फळा’ तर जनस्थानला ‘कॅमेरा’ निशाणी ; ‘सावाना’ निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप

0

नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून मंगळवारी सर्व पॅनलसह अपक्षांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात ग्रंथमित्र पॅनलला ‘फळा’ तर त्यांच्यासमोर असलेल्या जनस्थान पॅनलला ‘कॅमेरा’ निशाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली.

वाचनालायाच्या सभागृहात या चिन्हांचे वाटप करण्यात आले. सकाळी 11 वाजता चिन्हवाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यात ग्रंथमित्र पॅनलकडून अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या विलास औरंगाबादकर, उपाध्यक्षपदासाठीचे किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्यकारी मंडळात असलेले संजय करंजकर, वसंत खैरनार, जयप्रकाश जातेगावकर, देवदत्त जोशी, वेदश्री थिगळे, गिरीश नातू, अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, संगीता बाफना, श्रीकांत बेणी, धर्माजी बोडके, शंकर बोर्‍हाडे, उदयकुमार मुंगी, भालचंद्र वाघ, भानुदास शौचे या सर्वांना पॅनल म्हणून ‘फळा’ ही निशाणी देण्यात आली. तर जनस्थान पॅनलमधील उपाध्यक्षपदासाठीचे अरुण नेवासकर, कार्यकारी मंडळ सदस्यासाठी निवडणूक लढवणारे मोहन उपासनी, सुरेश गायधनी, शामला चव्हाण, राजेश जुन्नरे, धनंजय बेळे, सतीश महाजन, सुनेत्रा महाजन, नंदन रहाणे, विनोद राठोड, हंसराज वडघुले, अमित शिंगणे, समीर शेटे, मकरंद सुखात्मे, चैत्रा हुदलीकर, मंदार क्षेमकल्याणी यांना ‘कॅमेरा’ ही निशाणी देण्यात आली.

याशिवाय आणखी एक परिवर्तन पॅनल रिंगणात असून त्यातील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे प्रभाकर कुलकर्णी, उपाध्यक्ष पदासाठीचे प्रभाकर कुलकर्णी तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी निवडणूक लढवणारे दीपक कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी, शशांक मदाने, हेमंत राऊत व कृष्णा शहाणे यांना ‘पाटी’ ही निशाणी देण्यात आली. दरम्यान, सार्वजनिक वाचनालयासाठी 2 एप्रिलला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून 3 एप्रिलला सकाळी 10 पासून निकाल घोषित होणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*