गोव्यात पोर्तुगीजकालीन पूल कोसळला; दोघांचा मृत्यू, 30 बेपत्ता

0
दक्षिण गोव्यातील कुरचोरेममध्ये गुरुवारी पोर्तुगीजकालीन पूल कोसळल्यामुळे दोघे बुडाले, तर ३० जण बेपत्ता झाले.
त्यापैकी २० जणांनी पाेहून किनारा गाठला.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौदल तसेच तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांना बचावकार्यात मदत मागितली आहे.
रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू हाेते. कुरचोरेममध्ये एका नदीच्या पात्रात एक तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता. याबाबत माहिती कळताच गावकरी त्याला वाचविण्यासाठी धावले.
आपत्कालीन पथकालाही पाचारण करण्यात अाले. नदीवरील पुलावर सुमारे ५० जण जमा झाले होते.
यादरम्यान सॅन्सव्हरडेम नदीवरील पूल कोसळला आणि लोक नदीत पडले. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. पोर्तुगालच्या राजवटीत या पुलाचे बांधकाम झाले होते.

LEAVE A REPLY

*