गोवंश हत्या करणार्‍यांवर गुन्हे दाखल न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन

0
नंदुरबार । गेल्या आठवडयात पलिकेच्या कचरा डेपोवर मांस आढळल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी मांस उचलणारे, टाकणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गोवंश हत्या करणार्‍यांना मोकाट सोडण्यात आले आहे. याबाबत संबंधितांविरूध्द आठ दिवसांत गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे दि.3 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दि.23 रोजी पालिकेचा कचरा डेपोत जनावरांचे मांस आढळले ते कोणत्या पशुंचे आहे. गोवंशाचे आहे की कसे, याबाबतची पडताळणी करण्यासाठी नमुन प्रयोगााळेत पाठविले आहेत. याबाबत केतन रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पालिकेचे मुख्याधिकारी कचरा ठेकेदार कंपनीसह 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपअधिक्षक रमेश पवार, निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली. कचरा डेपोत फेकलेले जनावरांचे मांस गायीचे आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मांसाचे नमुने घेतले. त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई प्रलंबीत आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी सांगितले की, मुख्याधिकारी, ठेकेदार कंपनीप्रमुख म्हणून जबाबदारी आहेत.

याप्रकराशी थेट संबंध येत नाही. त्यांच्याविरूध्द सकृतदर्शन गुन्हा दाखल होणे, नियमानुसार किंवा जबाबदारी म्हणून योग्य ठरतो. मात्र हे मांस ज्या गोवंशाचे आहे, ते कापले कोणी, याचा तपास होणे आवश्यक आहे. पोलीसांच्या नोंदीतील 20 जणांपैकी कोणाचे किती जबाब घेतले, याबाबत अनभिज्ञता आहे. यातील मुख्य संशयीताचा शोध घेवून अटक करावी, अशी मागणी डॉ.मोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*