गोल्फपटू टायगर वुड्सला नशेत वाहन चालवल्याप्रकरणी अटक

0

गोल्फपटू टायगर वुड्सला नशेत वाहन चालवल्याप्रकरणी अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडात वुड्सला अटक करण्यात आली आहे.

मद्यप्राशन करुन किंवा अमली पदार्थाचे सेवन करुन वुड्स वाहन चालवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास टायगर वुड्स नशेत गाडी चालवत असताना दक्षिण फ्लोरिडातून पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळी अकराच्या सुमारास त्याची तुरुंगातून सुटका झाली. दक्षिण फ्लोरिडामधील ज्यूपिटर पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले होते.

पोलीस प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

*