गोलंदाज आशिष नेहराची निवृत्तीची घोषणा; 1 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अखेरचा सामना

0

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-20 सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना या निर्णयाबाबत आशिष नेहराने माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे.

LEAVE A REPLY

*