गोध्रा जळीतकांड : ११ दोषींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा

0

गुजरात हायकोर्टाने गोध्रा जळीतकांडाप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला.

फाशीची शिक्षा झालेल्या ११ दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आहे.

गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावली होती. ५९ प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशेष न्यायालयाने १ मार्च २०११ रोजी निकाल दिला होता.

यात ३१ जणांना दोषी ठरवण्यात आले तर ६३ जणांची सुटका करण्यात आली होती. दोषींपैकी ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. याप्रकरणात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

LEAVE A REPLY

*