गोधडी हिसकावल्याने वृध्दास भोसकून मारले

0

24 तासांत आरोपी गजाआड, माळीवाड्यातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- माळीवाडा परिसरात मार्केट यार्डशेजारील फुटपाथवर झोपण्यासाठी अंथरूण हिसकावल्याच्या रागातून एकाने वृद्धास भोसकून मारले. पोलिसांनी श्रीकांत सुभाष सोळवंडे (रा. बंगाल चौकी) याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शुक्रवारी मयत डांगे (पुर्ण नाव माहिती नाही) हा फुटपाथवर झोपण्यासाठी आरोपी श्रीकांत याच्याकडे गोधडी मागण्यासाठी गेला होता. मात्र त्याने नकार दिल्यामुळे मयत डांगे याने कोणाला न विचारता श्रीकांत याचे अंथरूण घेऊन गेला. या प्रकाराचा राग आल्यामुळे त्याने वृद्ध व्यक्तीस एका धारधार हत्याराने पोटावर वार करून ठार मारले.
भरदिवसा ही घटना घडल्यामुळे माळीवाडा परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना स्थानिक नागरिक व प्रवाशांनी पाहिली असता याची माहिती पोलिसांना देण्यात आली. कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वृद्ध व्यक्तीस उचलुन उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच तो मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही घटना कशी व कोणी केली याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता. मात्र मयत व्यक्तीच्या बेंबीवर एक वार असल्यामुळे त्याचे खुन करण्यात आला असावा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून खुनाचे धागेदोरे शोधणे पोलिसांपुढे आव्हाण होते. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन काही संशयीत गोष्टींची शहानिशा केली.
रात्री उशिरा आरोपीस सोनार यांनी अटक केली. आज त्यास पुढील तपासासाठी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तापास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. ही कामगिरी पोलीस नाईक दिपक गाडीलकर, गणेश लबडे, रवींद्र घुंगासे, अविनाश बर्डे, सुमित गवळी, दुधाळ, धामणे, बंडू भागवत यांनी आरोपी श्रीकांत सुभाष सोळवंडे, सोनार, पोलीस नाईक बापुसाहेब म्हस्के, इस्राईल पठाण यांनी केली.

LEAVE A REPLY

*