गोदावरी अभियांत्रिकीत २१ रोजी ‘नॅक्टटेस्टम’ राष्ट्रीय परीषद

0

जळगाव |  प्रतिनिधी :  येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ङ्घनॅक्टटेस्टमफ या राष्ट्रीय स्तरावरील परीषदेचे दि. २१ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. या परीषदेत देशभरातील १०० संशोधक सहभागी होणार आहे.

अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सध्याच्या संशोधनात्मक आविष्कारांना उत्पादनाच्या स्वरूपात व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणुन गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेपासुन एकदिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय परीषदेचे उदघाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.जी. गायकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन नागपुर व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन.एस.चौधरी, एस.बी.जैन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. डी.पी. कोठारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ यांच्यासह गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ. अनिकेत पाटील, प्राचार्य डॉ. व्हि.जी. अराजपुरे , उपप्राचार्य प्रविण फालक, गोदावरी आयएमआरचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या राष्ट्रीय परीषदेत देशभरातील १०० संशोधक पेपर सादरीकरण करणार आहे. तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य देखिल या परीषदेसाठी आमंत्रीत केले जाणार आहे.  तरी या परीषदेत सहभागी होणार्‍या मान्यवरांनी प्रा. विजय चौधरी ०७५८८८१३४५७, प्रा. किशोर महाजन ०९८६०४१८७३७, प्रा. विजय व्ही. चौधरी ०८९८३५५६६२७, डॉ. विजयकुमार वानखेडे ०९३७२२४५९३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संशोधकांसाठी नवं व्यासपीठ – प्राचार्य डॉ. व्ही.जी.ीअराजपुरे

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेली राष्ट्रीय परीषद संशोधकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ ठरणार आहे.खान्देशातील संशोधकांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देतांना या व्यासपीठाच्या माध्यमातुन खान्देशात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय मानाचा तुरा रोवेल अशी ग्वाही प्राचार्य डॉ. व्ही.जी. अराजपुरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*