गोदावरीच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले

0

गंगापूर धरणातून 700 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव (वार्ताहर)- कालव्यांच्या दुरुस्तीनंतर उजवा कालवा 300 क्युसेकने सोडण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता या कालव्याला नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून पाणी सोडण्यात आले आहे. उजव्याचे पाणी चितळी तसेच पुणतांबा भागात 14 मे रोजी पोहचेल असा अंदाज आहे. दुसरीकडे डाव्या कालव्याचे पाणी काल गुरुवारी दुपारी 2 वाजता कोपरगाव परिसरात पोहचले.
तेथील पालिकेचा तलाव काहिसा भरून हे पाणी पढेगाव भागाकडे धावणार आहे.
कालव्यांच्या फुटतुटीनंतर दोन्ही कालवे सुरळीत सुरू झाले आहेत. मधमेश्‍वर बंधार्‍याची लेव्हल राहावी यासाठी कालवे सुरुवातीला कमी दाबाने सोडण्यात आले. दारणा तसेच मुकणे धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 700 क्युसेकने पाणी बुधवारी सायंकाळी 7 वाजता सोडण्यात आले आहे. हे पाणी खाली मधमेश्‍वर बंधार्‍यात गुरुवारी रात्री 12 वाजता पोहचलेले असेल. दोन्ही कालव्यांसाठी एकूण 800 ते 850 क्युसेक पाणी एकूण पाणी सोडावे लागते.
तेव्हा ते सुरळीत वाहतात. त्याकरिता वरील धरणांतून 1300 ते 1400 क्युसेकने पाण्याची आवक मधमेश्‍वर बंधार्‍यात व्हायला हवी. सध्या मधमेश्‍वर मधील पाणी व गंगापूरमधून येणारे पाणी यावर कालवे सुरू आहेत. दारणा तसेच मुकणेतून पाणी काढावे लागणार आहे. या दोन्ही कालव्यांचे हे आवर्तन साधरणत: 22 ते 23 दिवसांचे असेल.

LEAVE A REPLY

*