गोदाघाटावर नववर्ष स्वागतासाठी साकारली ‘महारांगोळी’

0

नाशिक : शहरातील नववर्ष स्वागत समिती राष्ट्रीय विकास मंडळाने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गंगाघाटावर महारांगोळी काढण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता ही रांगोळी काढून पुर्ण झाली आहे. हजारो नाशिकरांनी रांगोळी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. ही महारांगोळी नागरिकांना बघण्यासाठी 26 ते 28 तारखेपर्यंत खुली असणार आहे .

100 फूट बाय 200 फुट या आकारात ही रांगोळी साकारण्यात आली आहे. यासाठी जवळपासस 5 हजार किलो रंग आणि 3000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. यंदा संतांची मांदियाळी या संकल्पनेवर महारांगोळी काढण्यात आली आहे.

गोदाघाटावरील जुना भाजीबाजार येथील पटांगणात संतांची मांदियाळी या संकल्पनेवर आधारित या रांगोळीमध्ये सर्वात मध्यभागी विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. रांगोळीच्या आजुबाजूला संतांची 20 वचने, एक गुढी, वीणा, तुळस, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच पंढरपूरच्या वारीत असलेले रिंगण आणि त्यात पळणारा अश्व, चंद्रभागा नदी आणि तेथील वाळवंट आणि त्या वाळवंटात जमलेले वारकरी अशी रांगोळी साकारण्यात आली आहे.

आज सकाळी पाऊनेसात वाजेच्या सुमारास रांगोळी काढण्यास प्रारंभ करण्यात आला. यादरम्यान, सव्वाशेपेक्षा अधिक महिला सहभागी होत्या. अवघ्या 3 तासात म्हणजेच सकाळी दहा वाजेच्या सुमारास महारांगोळी पूर्ण करण्यात आली.

LEAVE A REPLY

*