गोडधोडाचे नैवेद्य दाखवून नाशकात गुढींचे विसर्जन

0

नाशिक, ता. २८ : कुठे श्रीखंड पुरी, तर कुठे पुरणपोळी असा नववर्षानिमित्त गोडधोडाचा नैवेद्य दाखवून आज सकाळी उभारलेल्या गुढीचे दुपारी दीडच्या सुमारास नाशिककरांनी विधीवत विसर्जन केले.

दुपारी कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रितपणे गुढीची प्रार्थना करून यंदाचे वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्धीचे जावे यासाठी प्रार्थना केली.

पंचागानुसार यंदा अमावस्या समाप्ती आज सकाळी ८.२८ला झाली. त्यानंतर चैत्र प्रतिपदेचा मुहूर्त असल्याने सर्वांनी साडेआठनंतर गुढी उभारली.

दुपारी परंपरेप्रमाणे साग्रसंगीत स्वयंपाक करून गुढीला नैवेद्य दाखविण्यात आला.

शहरातील अनेक मंदिरांवरही गुढी उभारण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*