गृहस्वप्न साकारण्याची संधी ; ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे आज उद्घाटन

0

नाशिक : गुढीपाडव्याचे निमित्त आणि खास नाशिकरोडकरांच्या आग्रहास्तव ‘देशदूत’च्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी तीन दिवसीय ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता फिलोमिना कॉन्व्हेंट स्कूलसमोर, जेलरोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा शुभारंभ होईल. येत्या रविवार (दि.26) पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

शहराची बदलती समीकरणे लक्षात घेता नाशिककरांचे गृहस्वप्न साकार करण्यासाठी ‘देशदूत’ने विभागीय प्रॉपटी एक्स्पो’ प्रदर्शनाची संकल्पना अस्तित्वात आणली. या उपक्रमातून आजवर असंख्य ग्राहकांची गृहस्वप्नपूर्ती झाली. ही बाब लक्षात घेता असे प्रदर्शन पुन्हा आयोजित करण्याचा नाशिकरोडवासीयांमध्ये सूर असल्याने आताच्या आयोजनातून त्यास प्रतिसद देण्यात आला आहे. सदर एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ‘के्रडाई’ नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, बिझनेस बँकेचे अध्यक्ष वसंत नगरकर, कारडा कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे चेअरमन नरेश कारडा, गिरी असोसिएटस्चे चेअरमन गिरीश गुप्ता, मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि गृहस्वप्न उराशी बाळगणार्‍या सर्वसामान्यांमध्ये सेतूबंधन करण्याचे काम ‘देशदूत’ या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे. प्रदर्शनात नाशिकरोड व परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक तसेच गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. सदर प्रदर्शनाचे कारडा कन्स्ट्रक्शन हे प्रायोजक तर गिरी असोसिएटस् सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनास नाशिकरोड व परिसरातील नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागी बांधकाम व्यावसायिक संस्था : कारडा कन्स्ट्रक्शन, गिरी असोसिएटस्, छेडा गु्रप, आदित्य एन्टरप्रायजेस, श्री बिल्डकॉन, जे. पी. डेव्हलपर्स, एम्पायर रिअ‍ॅलिटी, श्रेयस फायनान्स कन्सलटन्सी, श्रेया डेव्हलपर्स प्रा. लि., शिवराम ग्रुप, ईशानी एन्टरप्रायजेस, दीपक बिल्डर्स, अजित बने कन्स्ट्रक्शन, गिल्स इन्फ्रास्ट्रक्चर, अ‍ॅथेटिक प्रिमायसेस अ‍ॅण्ड रेसिडेन्शियल, आर. के. मार्केटिंग, रेडिओ नमकीन (म्युझिक पार्टनर).

LEAVE A REPLY

*